मराठी माझं माहेर

The food you love, the tradition we love.

Originally published in mr
Reactions 2
494
Deepali sanotia
Deepali sanotia 07 Aug, 2021 | 1 min read

महाराष्ट्र म्हणजे आम्ही सारे खवय्यांचा प्रान्त. जिभेला अगदी पाणी सुटत जेव्हा डोळ्यां समोर पुरणाच्या पोळीच ताट येतं. मस्त पैकी गरम-गरम पुरणाची पोळी, त्यांवर साजूक तूप आणि सोबत खमंग आमटी. आहो! तोंडात पाणी सुटले.

मित्रांनो, माझा जन्म एका मराठी परिवारात झाला आणि माझं लग्न इण्टरकास्ट आहे. आता मी मालवी आणि मराठी माझं माहेर.

म्हणूनच माझ्या हाताची चव बरीच काही मराठी आणि थोडीफार मालवी आहे.

माझ्या घरच्यांना म्हणून माझ्या हाताचा स्वयंपाक आवडतो.

एक सान्गू तुम्हाला....लग्ना आधी मी नेहमीच ऐकलं होतं की मराठी माणूस म्हणजे कढ़ी चट, पण लग्न झाल्यानंतर जेवढ़ी कढ़ी मी खाल्ली तेवढ़ी तर लग्ना पूर्वी आईच्या घरी पण नव्हती खाल्ली होती. लोकं कश्याला मराठी लोकांना कढ़ी चट म्हणतात म्हाला अजून पण कळलं नाही.

अता आईच्या घरी जाणं थोडं कमी होतं, म्हणूनच तिच्या हाताच जेवण फार आठवतं.

आईच्या घरी ज्या दिवशी कुळधर्म असतं त्या दिवशी नेवैद्याच ताट भरलं असतं. पुरणाची पोळी, आमटी, कढ़ी, कुर्डाई, पापड, चटनी, कोशम्बीर, खीर, पात्तळ भाजी, अळूच्या वड्या, मिरचीचा ठेसा, भोपळ्याचीभाजी आणखीन पण बरंच काही.

आईच्या हाताचे घारघे आणि पातोड्या जर तुम्ही खाल्यान तर खातं रहाल.

कुळधर्माच्या निमित्ताने सर्वे जण एका जागी एकत्र होतात, मिळून स्वयंपाक करतात आणि देवीच्या आरती नन्तर ताटं वाढले जातात. आम्ही सर्वे खूब गम्मत करतो.

हे असं काही माझ्या सासरी होत नाही. हा सोहळा मी इकडे फार मिस करते.

माझं फार मोठं कुटुंब होतं. आमच्या आजी, त्या जगत वहिनी होत्या. सर्वे त्यांना वहिनीच म्हणायचे, आजोबा सुद्धा त्यान्च्या स्टाईल मधे मयनी म्हणायचे. आमच्या वाहिनीच्या हाताच्या पातौड्या इतक्या चवदार असायच्या कि सर्व जण वाट बघायचे, केव्हा त्यान्च्या केलेल्या पातौड्या खायला मिळतील.

आईच्या हाताचे अनारसे, ढ़िरडे, थालीपीठ, एकदम उत्तम पदार्थ असायच्ये. अनारस्याचे पिठ अजून पण म्हाला आईच करून देते. म्ही फक्त आयत्या-मायत्या पिठाचे अनारसे करतें आणि तेवढंच करून दमते पण.

जुन्या लोकांची कमालच होती, ते काय-काय पदार्थ घरीच करायच्ये.

मित्रांनो, म्ही लवकरच तुम्हां सर्वांना भेटेल महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची रेसिपिज़ सोबत.

आता मी माझ्या गप्पा-गोष्टी इथेच थांबवते. पुन्हा भेटू या.

तुमची

दीपाली सनोटीया(लोटारकर)














2 likes

Published By

Deepali sanotia

deepalisanotia

Comments

Appreciate the author by telling what you feel about the post 💓

Please Login or Create a free account to comment.