प्रिय

Love

Originally published in mr
Reactions 0
566
Neha Dhole
Neha Dhole 22 Mar, 2021 | 1 min read

प्रिय....,


  तु कायमच प्रिय म्हणून तुला प्रिय किंवा प्राणप्रिय देखील म्हणू शकते. न कळत्या वयात आवडलेल्या गोष्टींवरच प्रेम चिरंतन राहत त्या पैकीच तु एक. आणि दिवसेंदिवस ते कायम वाढतच चाललंय. खरं तर वयाच्या कितव्या वर्षी तु मला आवडालायला लागला माहिती नाही. पण जेव्हा पासून कळतं तेव्हा पासून तुला बघितल्या शिवाय दिवसाची सुरुवात कधी केलीच नाही. आपल्या नात्याला नाव काय बरं द्यावं...? मैत्री की पाहिलं प्रेम...? मित्रासारखा कधीही हक्काने जवळ करावा असा तर तु आहेसच, पण तुझ्याशिवाय दिवसाची कल्पना देखील करू शकत नाही.अशी एक अनामिक ओढ देखील आहे. आयुष्यातील सुख दुःखात कुणी असो वा नसो तु मात्र कायम जवळ. कुठलाही सिझन असो, महिना असो, पण आयुष्यातील तुझी रिप्लेसमेंट कुणीच नाही करू शकणार. पण अति प्रेम नेहमीच चिंतेचा विषय होतो. म्हणुन मला नेहमी तुझ्या पासून दूर राहण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. पण त्यांना कोण सांगणार हेच प्रेम सगळे सुखदुःख पचवायला मदत करतं.


  ओठांना तुझा स्पर्ष झाल्यानंतर जी काही तृप्तीची अनुभूती आहे ना, आहाहा ती अवर्णनीय.... तिला तर कुठल्याच शब्दांत बांधता येणार नाही. आणि पाऊस आणि तु... तुमच्या दोघांची बरोबरी तर कशाचीच होवू शकत नाही. तासांतास तुला जवळ घेवून खिडकीतून पडणारा तो पाऊस बघायचा. ह्यात जे काही स्वर्गसुख आहे ना ते बाकीच्यांना कधीही नाही कळणार... तसा तु लहानपणसूनच कायमच जवळचा पण वाढत्या वयानुसार प्रेम बहरत गेलं. आधी फक्त झोप येवू नये म्हणून तुझा घोट घेतला जायचा. मग हळुहळु कंटाळा आला की तुझंच नाव ओठांवर यायचं. नंतर मैत्रीणींसोबत केलेले प्लॅन्स असतील , ऑफिसमध्ये आलेलं टेंशन असेल. किंवा कुठला महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर सगळं तुझ्या साक्षीनेच केलेलं. हे माझंच नाही तर प्रत्येक चहा वेड्याचं म्हणणं असेल. असंच आपलं प्रेम कायम बहरत जावो आणि तुझ्या त्या अमृततुल्य चवीने माझीच नाही तर तमाम चहावेड्यांना तृप्त करत जा. सो माझ्या लाडक्या चहा , चल निरोप घेते भेटू चारची वेळ झाली...! 


तुझीच,

नेहा

©Neha R Dhole.

0 likes

Published By

Neha Dhole

nehadhole

Comments

Appreciate the author by telling what you feel about the post 💓

Please Login or Create a free account to comment.