मैत्री असावी तर अशी.....
खरंच...मैत्री असावी ती यश आणि पूजासारखी.... म्हणजे दोघ एकदम समजूतदार,एकमेकांना समजून घेणारे अजिबातच नाहीत आणि ते कधीच भांडत नाहीत असही अजिबात नाही. दोघंही प्रचंड भांडखोर आणि दोघांनाही प्रचंड अहं....नीट बोलत असतील तर मस्त कोणत्याही विषायावर गप्पा मारणारे दोघे.... पक्षी,किडे दोघांचा आवडता विषय...आणि chance मिळाला कि एकमेकांची चेष्टा,मस्करी करणार हे नक्की..तशी पूजा एकदम caring आणि यश स्वत:तच मग्न...यश स्वत:तच मग्न असला तरी बोलायला लागला कि दिलखुलास बोलणार...दोघांपैकी कोणी चिडल नसेल आणि दोघ नीट असले कि एकदम मस्त बोलणार पण कधी चुकून कोणाच एकाचं जरा जरी बिनसल तर मात्र महायुद्ध चालू....कोणी एक चिडलं तर कधीतरीच दुसरा समजूतदारपणे घेणार...इतर वेळी मात्र जोरदार भांडण चालु..मग २-४ दिवस तरी cold war…cold war निवळलं की नंतर बोलून भांडणाला सुरवात...आणि लगेच नमतं घेणाऱ्यातले दोघेही नाहीत. त्यात पूजा जरा जास्तच चिडकी....खूप वेळा ती चिडायच कारण यश काहीतरी विचार करून sad होतो किंवा असंच काहीसं कारण..आणि एक गोष्ट ठरलेली...यश एक शब्द बोलाला कि त्यावरून यशला भलं मोठा lecture चालू करणार पूजा आणि खात्रिनने भांडणार....(पूजा ला भांडायला फार आवडत. तिच्या मते भांडणांनी आपण जिवंत असल्याची जाणीव राहते आणि भांडणामुळे मैत्री अजून घट्ट होते) पूजा अशी आणि यशही काही कमी नाही...(यश तसं कमी बोलणारा पण बोलायला लागला कि मात्र प्रचंड बोलणार. तोही अत्यंत भांडखोर..स्वत:ची चूक मान्य करणार नाही...) स्वत:ला शहाणा समजून आगीत तेल ओतणारच ....मग अजूनच भडका...मग भांडण टोकाला जाणार हे अगदी नक्की....दोघ भांडायला लागले कि दोघांच्या बोलण्यातून अहं टपकणार आणि स्वत:ची चूक मान्य करायला कोणी तयार नसणार.. मग भांडण इतक ताणणार कि समोरच्याला किंवा दोघांपैकी एकाला तरी वाटेल आता काही मैत्री टिकत नाही...तुटलीच मैत्री आणि पुढच्याकक्षणी दोघांपैकी एक..पूजा किंवा यश अस बोलायला सुरवात करणार “आपण भांडलो होतो? मला तर काहीच आठवत नाही...” मग वातावरण एकदम थंड... (दोघांची memory जरा कमी आहे म्हणून काय ती दोघांची मैत्री आजपर्यंत घट्ट आहे....हेहे) आणि भांडण संपून परत पहिल्यासारख्या मस्त गप्पा चालू....अर्थात, हे फक्त पुढच भांडण होई पर्यंतच....... मग काय, तुम्हाला पण यश आणि पूजा सारखी मैत्री हवी की नको?
Comments
Appreciate the author by telling what you feel about the post 💓
No comments yet.
Be the first to express what you feel 🥰.
Please Login or Create a free account to comment.